Pages
- खेळ
- पाठ टाचण
- महाराष्ट्रातील नद्या
- ई-लाँकर
- योगासने
- RTE शासननिर्णय
- महाराष्ट्रातील गडकिल्ले
- ई-लर्निंग साहित्य
- इ-नकाशा
- लिंक/वेबसाईट
- शाळा सिद्दी
- मुल्यशिक्षण
- विविध शिष्यवृत्ती माहिती
- लोगो बनविणे
- विद्यार्थी भाषणे/माहिती
- मोबाईल app
- व्हिडीओ निर्मिती
- ई बुक्स
- परिपाठ
- मुल्यमापन नोंदी
- महापुरुष
- दिनविशेष
- शासकीय परिपत्रक
- आधारकार्ड
- थोर संत
- सुविचार संग्रह
- प्रेरणादायी विचार
- कार्यक्रम व्हिडीओ
- विविध शैक्षणिक खेळ
- छायाचित्रे
- बोधकथा
- शालेय प्रकल्प
- मतदान यादित आपले नाव शोधा
Tuesday, 2 August 2022
Friday, 29 July 2022
हर घर तिरंगा अभियान
"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत केंद्र सरकारच्या सूचनांनुसार "हर घर तिरंगा" हा उपक्रम राबविण्याबाबतच्या सविस्तर सूचना उपरोक्त वाचामधील शासन परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत. त्यास अनुसरुन उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत शासकीय निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, निवासस्थाने, इ. इमारतींवर "हर घर तिरंगा" या उपक्रमांतर्गत राष्ट्रध्वज फडकविण्यासंदर्भात त्यानुसार पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
केंद्र शासनाच्या सूचनांनुसार हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) हा उपक्रम दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट, २०२२ या कालावधीत राबविण्यात यावा. सदर उपक्रम उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत शासकीय/ निमशासकीय कार्यालये, सर्व विद्यापीठे, महाविद्यालये, वसतिगृहे, निवासस्थाने, इ. इमारतींवर राष्ट्रध्वज फडकविला जाईल याची खातरजमा सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी करावी. सदर उपक्रम राबविताना त्यात प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश करावा:
१) प्रत्येक विभाग / उप विभाग, विद्यापीठ / महाविद्यालय, कार्यालय यांच्या वेबसाईटच्या दर्शनी भागावर "घरोघरी तिरंगा ही टॅगलाईन तसेच तिरंग्याचे चित्र प्रदर्शित करावे.
२) सर्व शासकीय / निम शासकीय अधिकारी/कर्मचारी/शिक्षक/शिक्षेतर कर्मचारी/विद्यार्थी / पालक यांनी समाज माध्यामांद्वारे (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉटसअप, इ.) तिरंग्याविषयक चित्र, संदेश प्रदर्शित करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुखांनी आवाहन करावे.
३) उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत प्रभात फेरीचे आयोजन करुन या उपक्रमाबाबत पालक व नागरिकांमध्ये प्रचार, प्रसार व जाणीव जागृती करावी. त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा समावेश करुन मोठ्या प्रमाणावर आयोजन करता येईल.
खाजगी इमारतींवर अथवा राहत्या घरावर तिरंगा फडकविण्याबाबत सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी पुढाकार घ्यावा. जेणेकरुन इतर नागरिकांमध्ये या उपक्रमाची जागृती निर्माण होण्यास मदत होईल.
५) सांस्कृतिक कार्य विभागाने सदर उपक्रमाच्या जागृती मोहिमेसाठी जिंगल, गीते, ध्वनीचित्रफित इ. ची निर्मिती केली आहे. त्याबाबतची माहिती शासनाच्या https://mahaamnut.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर जिंगल्स, गीते, पोस्टर्स, इ. चा वापर शासकीय अधिकारी/कर्मचारी तसेच सर्वसाधारण नागरिकांनी देखील सदर उपक्रमाच्या प्रचार प्रसारासाठी करावा.
६) सदर उपक्रमाकरिता राष्ट्रध्वजाची उपलब्धता महसूल विभागामार्फत तसेच इतर विभागांमार्फत देखील तालुका / गांव पातळीपर्यंत करण्यासंबंधीच्या सूचना यापूर्वीच शासन स्तरावरुन देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्याकडून सुनिश्चित केलेल्या दराने राष्ट्रध्वज सर्वांना खरेदीसाठी उपलब्ध असतील.
(७) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांबाबतचे फोटो. चित्रफिती सांस्कृतिक कार्य विभागाच्या वेबसाईटवर अपलोड करण्याची कार्यवाही राज्य संपर्क अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना यांचेमार्फत सुरु आहे. त्याचप्रमाणे घरोघरी तिरंगा कार्यक्रमाचे फोटो, चित्रफिती,इ. मोठ्या प्रमाणावर वेबसाईटवर अपलोड होण्यासाठी राज्य संपर्क अधिकारी, रा.से.यो. यांनी विशेष पथक तयार करुन त्यांचेमार्फत अपलोड करण्याची कार्यवाही करावी. जेणेकरुन राज्यातील उपक्रमाची जास्तीत जास्त माहिती देश पातळीवर पोहचेल.
८) वरील सर्व उपक्रम राबविताना भारतीय ध्वज संहितेचे पालन होणे आवश्यक असून जाणते अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये याची सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे याबाबत देखील जाणीव जागृती करण्यात यावी.
मुख्याध्यापक प्राचार्य यांना उपक्रमाबाबत सूचना - घरोघरी तिरंगा
सर्व विद्यापीठाच्या कुलसचिवांनी त्यांच्या विद्यापीठाशी संलग्नीत सर्व महाविद्यालयांना सदर उपक्रमाबाबत सूचना द्याव्यात. सदर उपक्रमासाठी विभागांतर्गत सर्व संचालक, विभागीय सह संचालक, उपसंचालक / सहायक संचालक, जिल्हा स्तरावरील अधिकारी व कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, कार्यक्रम समन्वयक या शिवाय विद्यापीठ स्तरावरील कुलसचिव, उप कुलसचिव, सहायक कुलसचिव, महाविद्यालय स्तरावरील प्राचार्य, उप प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, इ. सर्व घटकांचे सहकार्य अपेक्षित असून सदर उपक्रम यशस्वी होण्याकरिता सर्वांनी योग्य ती कार्यवाही करावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दि. १६ ऑगस्ट, २०२२ नंतर तातडीने सर्व संचालकांमार्फत शासनास सादर करावा.
Thursday, 21 July 2022
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन परिचय
तुकाराम भाऊराव साठे (१ ऑगस्ट १९२० — १८ जुलै १९६९) हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते.साठे हे मांग (दलित) समाजामध्ये जन्मलेले होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले.दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
जन्म नाव-
तुकाराम भाऊराव साठे
टोपणनाव:-
अण्णा भाऊ साठे
जन्म:-
ऑगस्ट १, इ.स. १९२०
वाटेगाव, तालुका वाळवा, सांगली जिल्हा
मृत्यू:-
जुलै १८, इ.स. १९६९
शिक्षण:-
अशिक्षित
राष्ट्रीयत्व:-
भारतीय Flag of India.svg
धर्म:-
हिंदू
कार्यक्षेत्र:-
लेखक, साहित्यिक
भाषा:-
मराठी
साहित्य प्रकार:-
शाहिर, कथा, कादंबरीकार
चळवळ
संयुक्त महाराष्ट्र चळवळ
प्रसिद्ध साहित्यकृती
फकिरा
प्रभाव
बाबासाहेब आंबेडकर, श्रीपाद अमृत डांगे, कार्ल मार्क्स
वडील:-
भाऊराव साठे
आई:-
वालबाई साठे
पत्नी:-
कोंडाबाई साठे
जयवंता साठे
अपत्ये:-
मधुकर, शांता आणि शकुंतला
अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमाभागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले.
वैयक्तिक जीवन:-
अण्णा भाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांनी दोन लग्न केलीत, त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे ह्या होत. त्यांना एकूण तीन अपत्ये होती - मधुकर, शांता आणि शकुंतला.
राजकारण:-
साठे पहिल्यांदा कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित झाले.१९४४ मध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांच्या सोबत त्यांनी लालबावटा कला पथक स्थापन केले. याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते. ते १९४० च्या दशकामध्ये कार्यरत राहिले आणि तेविया अब्राम्स यांच्यानुसार, भारतातील साम्यवादाच्या आधी स्वातंत्र्याच्या नंतरची "१९५० च्या दशकातील सर्वात रोमांचक नाटकीय घटना" होती.भारतीय स्वातंत्र्य्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, "ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है!" इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते, जी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होती आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये, ज्याने भाषिक विभागातून वेगळे मराठीभाषी राज्य (बॉम्बे राज्य) निर्माण करण्याची मागणी केली होती.
साठे नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला. इ.स. १९५८ मध्ये, बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की, "पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे" यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले. या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरित, साठेंचे कार्य बौद्ध धर्माऐवजी मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होते.
त्यांनी म्हटले आहे की, "दलित लेखकांना सध्याच्या सांसारिक व हिंदू अत्याचारांपासून दलितांना मुक्त करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कारण दीर्घकालीन पारंपरिक श्रद्धांना त्वरित नष्ट केले जाऊ शकत नाही.
लेखन साहित्य:-
साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा (१९५९) समाविष्ट आहे, जिला इ.स. १९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. साठेंच्या लघु कथांचा संग्रह १५ आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि २७ अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली.
साठेंच्या पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरामध्ये, साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भुखमरीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढिवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकिराला चित्रित केले.नायक आणि त्याच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकारी द्वारे अटक आणि छळ दिला जातो, आणि अखेरीस फकिराला फाशी देऊन ठार मारले जाते.
मुंबई मधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला. त्यांनी तो डायस्टोपियन परिवाराच्या रूपात दाखवला.. त्यांनी त्यांच्या "मुंबईची लावणी" आणि "मुंबईचा गिरणीकामगार" या दोन गाण्यांतून मुंबईला 'दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान और अन्यायपूर्ण' असे म्हटले आहे..
साठेंनी लिहिलेली पुस्तके:-
अकलेची गोष्ट (लोकनाट्य, १९४५)
अण्णा भाऊ साठे : प्रातिनिधिक कथा (संपादक - डाॅ. एस.एम. भोसले)
१)अमृत
२)आघात
३)आबी (कथासंग्रह)
४)आवडी (कादंबरी)
५)इनामदार (नाटक, १९५८)
६)कापऱ्या चोर (लोकनाट्य)
७)कृष्णाकाठच्या कथा (कथासंग्रह)
८)खुळंवाडा (कथासंग्रह)
९)गजाआड (कथासंग्रह)
१०)गुऱ्हाळ
११)गुलाम (कादंबरी)
१२)चंदन (कादंबरी)
१३)चिखलातील कमळ (कादंबरी)
१४)चित्रा (कादंबरी, १९४५)
१५)चिरानगरची भुतं (कथासंग्रह), १९७८)
१६)नवती (कथासंग्रह)
१७)निखारा (कथासंग्रह)
१८)जिवंत काडतूस (कथासंग्रह)
१९)तारा
देशभक्त घोटाळे (लोकनाट्य, १९४६)
२०)पाझर (कादंबरी)
२१)पिसाळलेला माणूस (कथासंग्रह)
२२)पुढारी मिळाला (लोकनाट्य, १९५२)
२३)पेंग्याचं लगीन (नाटक)
२४)फकिरा (कादंबरी, १९५९)
२५)फरारी (कथासंग्रह)
२६)मथुरा (कादंबरी)
२७)माकडीचा माळ (कादंबरी, १९६३)
२८)रत्ना (कादंबरी)
२९)रानगंगा (कादंबरी)
३०)रूपा (कादंबरी)
३१)बरबाद्या कंजारी (कथासंग्रह, १९६०)
३२)बेकायदेशीर (लोकनाट्य, १९४७)
३३)माझी मुंबई (लोकनाट्य)
३४)मूक मिरवणूक(लोकनाट्य)
३५)रानबोका
३६)लोकमंत्र्यांचा दौरा (लोकनाट्य, १९५२)
३७)वारणेचा वाघ (कादंबरी, १९६८)
३८)वैजयंता (कादंबरी)
३९)वैर (कादंबरी)
४०)शेटजींचे इलेक्शन (लोकनाट्य, १९४६)
संघर्ष
सुगंधा:-
सुलतान (नाटक)
प्रवासवर्णन:-
कविता आणि माझा रशियाचा प्रवास
काव्ये:-
अण्णा भाऊ साठे यांचे पोवाडे व लावण्या.
साठेंच्या लेखनावर आधारित चित्रपट:-
वैजयंता (१९६१, कादंबरी – वैजयंता)
टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी – आवडी)
डोंगरची मैना (१९६९, कादंबरी – माकडीचा माळ)
मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी – चिखलातील कमळ)
वारणेचा वाघ (१९७०, कादंबरी – वारणेचा वाघ)
अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी – अलगूज)
फकिरा (कादंबरी – फकिरा).
साठेंवरील पुस्तके:-
अण्णाभाऊंचा संदेश (विनिमय पब्लिकेशन्स)
अण्णा भाऊ सांगून गेले (विलास रणसुभे)
अण्णा भाऊ साठे (मराठी कवी) – लेखक: बजरंग कोरडे, अनुवाद : विलास गिते, प्रकाशन : साहित्य अकादमी
अण्णा भाऊ साठे (बालवाङ्मय, लेखक - बाबुराव गुरव)
अण्णा भाऊ साठे (हिंदी, प्रा. रतनलाल सोनग्रा)
अण्णा भाऊ साठे (डाॅ. संजीवनी सुनील पाटील)
अण्णा भाऊ साठे : चरित्र आणि कार्य – विजयकुमार जोखे, नालंदा प्रकाशन
अण्णा भाऊ साठे विचारधन (विठ्ठल साठे)
अण्णाभाऊ साठे व्यक्ती आणि वाङ्मय ( प्रा.डाॅ. अंबादास सगट)
अण्णा भाऊ साठेलिखित 'फकीरा'ची समीक्षा (डाॅ. श्रीपाल सबनीस)
क्रांतिकारी अण्णाभाऊ साठे (प्रा. गौतम निकम)
समाज सुधारक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (संपादित, संपादक - ॲड. महेंद्र साठे).
वारसा:-
२०१९ च्या टपाल तिकिटावर अण्णाभाऊ साठे
अण्णाभाऊ साठेंचा पुतळा
साठे हे दलितांचे आणि विशेषतः मांग जातीचे प्रतीक बनले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना १९८५ मध्ये मांग समाजातीललोकांसाठी करण्यात आली. तसेच मानव हक्क अभियानाच्या (एक मांग-आंबेडकरी संस्था) स्थानिक शाखांमध्ये महिला साठेंची तसेच बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांची जयंती (मिरवणूक) आयोजित करतात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष - शिवसेना युती सारख्या राजकीय पक्षांनी मांगांकडून निवडणुकांमध्ये समर्थन मिळविण्यासाठी त्यांच्या प्रतिमेचा वापर केला आहे.
“अण्णा भाऊंच्या गोष्टींत अथवा लिखाणात विनोद नसतो, असं नाही; पण त्यांचा प्रकृतीधर्म आहे गंभीर लेखकाचा. ज्यांन फार भोगलं आहे, सात पडद्यांतून नव्हे, तर समोरासमोर जीवनातल्या क्रूर सत्याचं ज्याला दर्शन घडलं आहे. अशा पोटतिडकीने लिहणाऱ्या साहित्यिकाचा आत्मा त्यांना लाभला आहे. म्हणून साहजिकच त्यांच्या गोष्टी मोठ्या वैशिट्यपूर्ण असतात. म्हणून तत्कालीन सर्व बड्या कथाकारांपेक्षा ते निराळे आहेत. या लेखकाला प्रतिभेचे देणं लाभलं आहे. जीवनात आग ओकणाऱ्या हरतर्हेच्या गोष्टींच्या अनुभव त्यांच्या गाठी आहे. त्यांच्या मनात एकप्रकारचा पीळ आहे. ते अन्यायाविरुद्ध बंड उभारणाऱ्या वृत्तीचा पूजक आहे.”
वि.स. खांडेकर
साहित्यिक,
१ ऑगस्ट २००१ रोजी भारतीय पोस्टाने ₹४च्या टपाल तिकिटावर साठेंचे चित्र ठेवले होते. साठेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने १ ऑगस्ट २०१९ रोजी हे टपाल तिकीट वितरित करण्यात आले.
पुण्यातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक आणि मुंबईच्या कुर्लामधील एका उड्डाणपुलासह अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे.
Wednesday, 20 July 2022
लोकमान्य टिळक जीवन परिचय
-:बाळ गंगाधर टिळक:-
इ.स. १९१० च्या सुमारास घेतलेले लोकमान्य टिळकांचे प्रकाशचित्र
जन्म:
जुलै २३,इ.स. १८५६
रत्नागिरी(टिळक आळी), रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत
मृत्यू:
ऑगस्ट १, इ.स. १९२०
पुणे, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत
चळवळ:
भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना:
अखिल भारतीय काँग्रेस
पत्रकारिता/ लेखन:
केसरी
मराठा
प्रमुख स्मारके:
मुंबई, दिल्ली, पुणे
धर्म:
हिंदू
प्रभाव:
शिवाजी महाराज, तात्या टोपे, महाराणा प्रताप
प्रभावित:
महात्मा गांधी, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर
वडील:
गंगाधर रामचंद्र टिळक
आई:
पार्वतीबाई टिळक
पत्नी:
सत्यभामाबाई
अपत्ये:
श्रीधर बळवंत टिळक
तळटिपा:
"स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच."
ते लाल-बाल-पाल मधील एक होते.[३] टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना "भारतीय असंतोषाचे जनक" म्हटले. त्यांना "लोकमान्य" ही पदवी देखील बहाल करण्यात आली, ज्याचा अर्थ "लोकांनी [त्यांचा नेता म्हणून] स्वीकार केला".महात्मा गांधींनी त्यांना "आधुनिक भारताचा निर्माता" म्हटले.
बालपण:-
लोकमान्य टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई उर्फ तापीबाई आणि मुली व नातवंडे यांच्याबरोबर
टिळकांचा जन्म २३ जुलै, इ.स. १८५६ मध्ये रत्नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गाव होय.
प्लेगविरोधी फवारणीस विरोध
इ.स. १८९७ साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची (Bubonic Plague) साथ आली. उंदीर नष्ट करण्यासाठी ब्रिटिश सरकारने पुण्यात फवारणी मोहीम सुरू केली तेव्हा पुणेकरांनी विरोध केला. हा विरोध मोडून काढण्यासाठी पुण्याचा ब्रिटिश रेसिडेंट वॉल्टर चार्ल्स रँड याने लष्कराची मदत घेतली. व त्यांचे जवान पुण्यात आरोग्य विभागाच्या मदतीला आले, घरात घुसून जबरदस्तीने फवारणी करवून घेऊ लागले. आणि साथीचा फैलाव झाल्याचे कारण सांगून लोकांचे सामान, कपडे-लत्ते सर्रास जाळून टाकू लागले, यामुळे पुण्यात एकच हाहाकार उडाला. रँडसाहेब मुद्दाम आमची घरे जाळीत आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. टिळकांनी केसरीमधून या भूमिकेला उचलून धरले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? हा टिळकांनी अग्रलेख याच संदर्भातील आहे. टिळक लिहितात :"रँडसाहेबांच्या फवारणीचा मोर्चा आता आमच्या घरात माजघरात पोहोचला आहे.
रँडसाहेबांचे लाडके सोल्जर पायातल्या खेटरांसकट फवारणीचे धोटे घेऊन आमच्या घरात घुसतात. घरातले सामान रस्त्यावर फेकून देतात, जाळून टाकतात, हे कमी म्हणून की काय आमच्या देवघरात घुसून उंदरांबरोबर आमच्या विघ्नहर्त्या गणेशावरही फवारणी करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे."
टिळक-आगरकर मैत्री व वाद:-
डेक्कन कॉलेजमध्ये असतांना टिळकांची गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री झाली. आगरकरांकडे केसरीच्या संपादकपदाची धुरा टिळकांनी दिली होती. पण नंतर दोघांत बिनसले. टिळकांचे संस्थेतील एकंदर धोरणासंबंधी मतभेद झाले. आपल्या चाळीस पानी राजीनाम्यात टिळकांनी ‘निर्वाहापुरते वेतन’ या तत्त्वाऐवजी ‘सांपत्तिक स्थितीनुसार वेतन’ तसेच ‘राष्ट्रीय शिक्षण संस्थे’च्या उद्दिष्टाविरुद्ध ‘सरकारच्या मदतीवर चालणारी संस्था’ हे धोरण संस्थेच्या मूळ धोरणाला धक्के देणारे आहे, असे आग्रहाने सांगितले. या प्रश्नावर त्यांचा आगरकरांशी वाद झाला. याशिवाय दुसरा वाद "आधी कोण? राजकीय की सामाजिक?" या विषयावर झाला होता. जातिभेद नष्ट झाले पाहिजेत, असे ते निकराने मांडीत. परकीय सरकारने लोकमताची पर्वा न करता सुधारणेसाठी योग्य ते कायदे करावेत, असे आगरकरांचे मत होते. टिळकांचे म्हणणे असे होते की, आमच्या सुधारणा आम्हीच करू, परकीय सत्तेची ढवळाढवळ आमच्या सामाजिक वा धार्मिक बाबतीत होऊ नये. मात्र लोकमत अनुकूल असेल आणि धर्मवचनांच्या बाबतींत तडजोड होत असेल, तर असा कायदा करण्यास आमची काही हरकत नाही.दुष्काळ
मुख्य पाने: १८९७ची प्लेगची साथ व दामोदर चाफेकर
अभ्यासिकेत टिळक:-
इ.स. १८९६ साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. आपल्या केसरी या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ब्रिटिश सरकार ’दुष्काळ विमा निधी’ अतंर्गत लोकांकडून पैसा गोळा करत असे. त्याचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. तसेच सरकारच्या 'Famine Relief Code' नुसार दुष्काळ पडला असतांना शेतकऱ्यांना कर भरण्याची आवश्यकता नव्हती. तरी काही भागात सक्तीने करवसुली करण्यात येत असे. याविरुद्ध लोकांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केसरीद्वारे केले. त्यांच्या स्वयंसेवकांनी महाराष्ट्रभर गावागावात फिरून लोकांना 'Famine Relief Code' बद्दल माहिती देणारी पत्रके वाटली. याबरोबरच धनिकांनी व दुकानदारांनी अन्न व पैसा दान करावे असे आवाहन केले व यातून अनेक ठिकाणी सार्वजनिक खानावळी चालवल्या गेल्या.[ संदर्भ हवा ]
जहालवाद विरुद्ध मवाळवाद:-
तत्कालीन भारतीय नेतृत्वात भारतास स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांशी व्यवहार कसा असावा याबद्दल दोन स्पष्ट मतप्रवाह होते. इंग्रजांशी जुळवून घेउन भारतास स्वातंत्र्य देण्यास त्यांची मनधरणी करणे हा मतप्रवाह मवाळवाद समजला जातो तर इंग्रजांनी भारतास स्वातंत्र्य दिलेच पाहिजे व त्यासाठी त्यांच्याशी असलेले मतभेद उघड करून वेळ आल्यास कारवाया, आंदोलने करणे हा मतप्रवाह जहालवाद समजला जातो. टिळक जहालवादी होते.[ संदर्भ हवा ]
लाल-बाल-पाल:-
लाल बाल पाल
लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांची राजकीय मते एकमेकांशी जुळणारी होती. यामुळे या त्रिकुटाला लाल-बाल-पाल असे नामकरण मिळाले.[ संदर्भ हवा ]
बंगालच्या फाळणीविरुद्धचा लढा:-
८ जून १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्न केले; परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात. ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच या लीगचे ध्येय होते. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.
टिळकांच्या बाबतीमध्ये राम गणेश गडकरी असे म्हणाले होते की, बाळ गंगाधर टिळक हे मंडालेला गेल्यापासून या पुणे शहरात दुरून येणारा माणूस पाहून चटकन हातातली विडी विझवावी, या लायकीचे कोणी राहिलेले नाहीत.
पत्रकारितापत्रकारिता:-
केसरीतील अग्रलेख
मराठातील अग्रलेख
चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १८८१ मध्ये आर्यभूषण छापखाना काढला. टिळकांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने इ.स. १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून. प्रारंभी आगरकर केसरीचे व टिळक मराठाचे संपादक होते. अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणाऱ्या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा केसरीचा मुख्य उद्देश होता. जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करणे व सामाजिक परिवर्तनांसाठी जनजागृती करणे या विचारांनी केसरी सुरू झाले. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परीक्षणे प्रकाशित होत असत. मराठा वृत्तपत्र हे मुख्यत: शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यांवरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली. इ.स. १८८२च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.
सुरुवातीला आगरकरांकडे ' केसरी 'चे संपादकपद तर टिळकांकडे ' मराठा ' या इंग्रजी नियतकालिकाची संपादकीय जबाबदारी होती. तरीही टिळकांचे अग्रलेख या काळातही 'केसरी'त प्रसिद्ध होत होतेच. पुढे दोघांत तात्त्विक मतभेद झाले आणि टिळकांनी कर्जासह ' केसरी 'चे संपादकपद स्वतःकडे घेतले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत टिळकांचे अग्रलेख हाच ' केसरी 'चा आत्मा होता. १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले. ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ', ' उजाडले पण सूर्य कुठे आहे ,' ' टिळक सुटले पुढे काय ', ' प्रिन्सिपॉल , शिशुपाल की पशुपाल ', ' टोणग्याचे आचळ ', 'हे आमचे गुरूच नव्हेत ’, ' बादशहाब्राह्मण झाले ' हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख आहेत.साहित्य आणि संशोधन
टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके ’ओरायन’(Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas) ही त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक ’गीतारहस्य’ यात त्यांनी भगवद्गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे. त्यांचे इतर लिखाण :-
आर्क्टिक होम ऑफ वेदाज
ओरायन
गीतारहस्य
टिळक पंचांग पद्धती. (ही आज कित्येक ठिकाणी विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात वापरली जाते.)
टिळकांची पत्रे, एम. डी. विद्वांस यांनी संपादित.
वेदांचा काळ व वेदांग ज्योतिष (Vedic Chronology and Vedang Jyotish)
Selected documents of Lokamanya Bal Gangadhar Tilak, 1880-1920, रविंद्र कुमार यांनी संपादित केले आहे.
The Hindu philosophy of life, ethics and religion (१८८७ मध्ये प्रकाशित).
सामाजिक सुधारणांबाबत टिळकांची भूमिकाटिळकांच्या काळात, महिला आणि जातीच्या प्रश्नावर काँग्रेसमध्ये दोन गट होते - सुधारणावादी आणि पुराणमतवादी. जातीय भेदभाव दूर करणे, बालविवाहावर बंदी घालणे, विधवा विवाहाचे समर्थन करणे आणि महिला शिक्षण हे सुधारणावादी विचारधारेचे चार मुख्य आधार होते. महादेव गोविंद रानडे, डब्ल्यू.सी. बॅनर्जी, विष्णू हरी पंडित आणि नंतर गोपाळ गणेश आगरकर तसेच गोपाळ कृष्ण गोखले आदी या पक्षात होते. दुसरीकडे, विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि टिळक हे रूढीवादी विचारांचे नेतृत्व करीत होते.
महिला शिक्षणाबद्दल टिळकांचे विचार
टिळकांनी पूर्ण क्षमतेने स्त्री शिक्षणाला विरोध केला. परिमला व्ही. राव यांनी आपल्या शोधपेपरमध्ये मुख्यत्वे टिळकांच्या मराठा वर्तमानपत्राचा हवाला देत सांगितले की विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि टिळक यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या कट्टरपंथी गटाने १८८१ ते १९२० च्या दरम्यान कशाप्रकारे मुलींसाठी शाळा सुरू करण्याला आणि प्रत्येक समुदायाला शिक्षण देण्याच्या प्रयत्नांना विरोध केला. या गटाच्या विरोधामुळे महाराष्ट्रातील ११ पैकी ९ नगरपालिकांमध्ये प्रत्येकाला शिक्षण देण्याच्या प्रस्तावाला पराभवाला सामोरे जावे लागले. या गटाने राष्ट्रवादी शिक्षणाचा पुरस्कार केला, ज्यामध्ये धर्मशास्त्रांचे अध्यापन व त्याच्या कौशल्यांचा अभ्यास करण्यावर भर देण्यात आला.
विवाहाचे वय व टिळकांचे विचार:-
त्यावेळी मुलींचे लग्न अगदी लहान वयात होते, त्यामुळे त्यांना असह्य छळ व यातना सहन करावा लागला. पेशव्यांच्या राज्यात ब्राह्मण कुटुंबांयांसाठी हे अनिवार्य होते की आपल्या मुलीचे लग्न ९ वर्षांपेक्षा कमी वयात केले गेले पाहिजे. एका प्रसिद्ध प्रकरणात, मुलगी फूलमणीचे ११व्या वर्षीच लग्न केले होते, तिच्या ३५ वर्षीय पतीने तिच्याशी जबरदस्तीने संभोग (लैंगिक अत्याचार) केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. ब्रिटिश भारतात अशा अनेक घटना घडल्या होत्या ज्यामध्ये अल्पवयीन मुलींशी लैंगिक संबंध ठेवल्याने त्या अपंग झाल्या. विवाह आणि संमतीने लैंगिक संबंध यासाठीचे वय वाढविण्याची मागणी भारतातील समाजसुधारकांकडून करण्यात येत होती. म्हणूनच ब्रिटिश सरकारने १८९१ साली एक कायदा "एज ऑफ कॉन्सेन्ट ॲक्ट १८९१" तयार केला आहे ज्यानुसार १२ वर्षापेक्षा कमी वयाच्या विवाहित किंवा अविवाहित मुलीशी लैंगिक संबंध ठेवणे बलात्काराच्या प्रकारात येईल. काँग्रेसचे सुधारवादी लोकांचे या विधेयकाला समर्थन होते, परंतु टिळकांनी या प्रकरणात ब्रिटीश सरकारच्या हस्तक्षेपाला विरोध केला. ते म्हणाले - 'हा सरकारचा कायदा योग्य आणि उपयुक्त असू शकेल, परंतु तरीही सरकारने आमच्या सामाजिक परंपरा आणि जीवनशैलीत हस्तक्षेप करावा अशी आमची इच्छा नाही.
जातीचे निर्मूलन व गैर-ब्राम्हणांबद्दल टिळकांचे विचार:-
टिळकांनी जातीव्यवस्थेचे (द प्रॉस्पेक्ट्स ऑफ हिंदू कास्ट, मराठा, 10 जुलै 1881) समर्थन केले. टिळकांचा वर्ण व्यवस्थेवर ठाम विश्वास होता. त्यांचा असा विश्वास होता की ब्राह्मण जात सर्वात शुद्ध आहे आणि जातीव्यवस्थेला टिकवून ठेवणे देश व समाजाच्या हिताचे आहे. त्यांचे म्हणणे होते की जातींचे निर्मूलन होणे म्हणजे राष्ट्रीयत्वाचा ऱ्हास होणे होय. त्यांच्या मते, जात हा हिंदू समाजाचा आधार आहे आणि जातीचा नाश म्हणजे हिंदू समाजाचा नाश.
जेव्हा ज्योतिबा फुले यांनी अनिवार्य शिक्षणाचे अभियान सुरू केले तेव्हा टिळकांनी त्याला विरोध केला. टिळकांचा असे म्हणणे होते की, प्रत्येक बालकाला इतिहास, भूगोल, गणित शिकवण्यास काही अर्थ नाही, कारण त्यांचा उपयोग त्यांच्या आयुष्यात होत नाही. कुणबी जातीच्या मुलांना इतिहास, भूगोल किंवा गणिताचे शिक्षण दिल्यास त्यांचे नुकसान होईल कारण ते त्यांचे वांशिक कौशल्य विसरतील. ते पुढे म्हणाले की, कुणबी जातीच्या मुलांनी आपला पारंपरिक शेती व्यवसाय करावा आणि शिक्षणापासून दूर रहावे. टिळक हे विचार मांडत असताना, त्याच वेळी ब्रिटिश सरकार शाळा उघडत होती, आणि त्यात सर्व जातींच्या मुलांना शिक्षण घेण्याचा अधिकार देत होती. टिळकांनी यास ब्रिटिश सरकारची गंभीर चूक म्हटली. सार्वजनिक शाळेत महार आणि मांग जातीच्या मुलांना प्रवेश देण्याबद्दल टिळकांनी ब्रिटीश सरकारला इशारा दिला की, महार-मांग मुले ब्राह्मण मुलांबरोबर बसल्याने हिंदू धर्म सुरक्षित राहणार नाही.टिळकांबद्दल डॉ. आंबेडकरांचे विचार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा असा विश्वास होता की टिळकांमुळे काँग्रेसने समाज सुधारणेचे काम थांबवले. यामुळे भारतातील सामाजिक परिवर्तनाचा मार्ग बंद झाला आणि राजकीय सुधारणाही थांबल्या. ज्या काळात महादेव गोविंद रानडे आणि गोपाळ कृष्ण गोखले ते ज्योतिबा फुले सामाजिक सुधारणेसाठी कार्यरत होते, त्या काळात टिळक पारंपरिक नेत्यांचे नेतृत्व करीत होते. आणि या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी टिळकांबद्दल सातत्याने टीकात्मक लेखन केलेले आहे.
टिळक त्यावेळी काँग्रेस पक्षात कार्यरत होते. काँग्रेसमध्येच एक संस्था होती - सोशल कॉन्फरन्स ज्याने समाज सुधारणेसाठी काम केले. १९९५ मध्ये जेव्हा काँग्रेसचे अधिवेशन चालू होते, तेव्हा काही लोक म्हणाले की जर काँग्रेसच्या अंतर्गत सोशल कॉन्फरन्सने समाज सुधारणेचे काम केले तर आम्ही काँग्रेसचा पंडाल जाळून टाकू. अशा लोकांचे वैचारिक नेतृत्व टिळक करीत होते. शेवटी निर्णय घेण्यात आला की काँग्रेसचा समाजसुधारणाच्या कोणत्याही कार्यक्रमाशी संबंध राहणार नाही, मग ते कितीही महत्त्वाचे असले तरीही. काँग्रेस केवळ एक राजकीय व्यासपीठ बनले, त्यांनी समाज सुधारणेचे कार्यक्रम थांबविले. याचे वर्णन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या "गांधींनी आणि काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केले?" पुस्तकात तपशीलवार केले आहे. "रानडे, गांधी आणि जिन्ना" या आपल्या दुसऱ्या पुस्तकात आंबेडकर लिहितात - "विचारवंतांचा एक गट कट्टरपंथी आणि अराजकीय आहे आणि दुसरा गट पुरोगामी आणि राजकीय आहे." पहिल्या गटाचे नेतृत्व आधी चिपळूणकर आणि नंतर टिळक यांनी केले. या दोघांमुळे रानडे यांना विविध प्रकारचे त्रास झाले. यामुळे केवळ सामाजिक सुधारणांच्या कामांचेच नुकसान झाले नाही तर राजकीय सुधारणांनाही सर्वाधिक फटका बसल्याचे अनुभवावरून दिसून येते.
टिळक आणि रानडे यांची तुलना करताना बाबासाहेब आंबेडकर हेही लिहितात की निःसंशयपणे टिळक तुरुंगात राहिले, परंतु रानडे यांची लढाई अधिक कठीण होती. ज्या व्यक्तीने राजकीय लढा दिला त्याला समाज डोक्यावर घेतो, तर समाज सुधारणेसाठी संघर्ष करणारी व्यक्ती बऱ्याचदा एकटी असते आणि तिला सर्व प्रकारच्या अपमानांना सामोरे जावे लागते.
टिळकांचे स्पष्ट मत होते की शेतकरी आणि कारागीर जातींनी राजकारणात प्रवेश करू नये. १९१८ मध्ये या जातींनी राजकीय प्रतिनिधित्त्व मागितले असता टिळकांनी सोलापुरातील एका सभेत असे म्हटले होते की 'तेली-तामोली-कुणबी विधानसभेत जाऊन काय करणार?' बाबासाहेबांच्या मते, टिळकांच्या मते या जातींतील लोकांचे कार्य कायद्यांचे अनुसरण करणे आहे आणि त्यांना कायदे करण्याचा अधिकार असू नये.सार्वजनिक उत्सवांची सुरुवात
राजकीय जनजागृतीसाठी इ.स. १८९३ साली टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला आणि महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या शिवाजी जयंतीला व्यापक स्वरुपात साजरी केले.शिवजयंती आणि गणेशोत्सव या सार्वजनिक सणांद्वारे ब्रिटिशांविरुद्ध लोकांना उभे राहण्यासाठी जागृत करणे हे टिळकांचे उद्दिष्ट होते.
कौटुंबिक जीवन:-
कौटुंबिक स्तरावर १९०२-०३ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथही प्लेगला बळी पडला. पत्नीचा देहान्त ...साली झाला. त्यांच्या राजकीय धकाधकीच्या जीवनात पत्नीच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांची जबाबदारी ...नी सांभाळली. पण त्यांची दोन्ही धाकटी मुले टिळकबंधू म्हणून ओळखली जात, आणि ती आगरकरांच्या विचारांशी जवळीक ठेवणारी होती.[ संदर्भ हवा
टिळकांवर लिहिलेली पुस्तके:-
टिळक आणि आगरकर - तीन अंकी नाटक, लेखक विश्राम बेडेकर
टिळक भारत, लेखक शि.ल. करंदीकर
टिळकांची पत्रे, संपादक : एम. धोंडोपंत विद्वांस
मंडालेचा राजबंदी, लेखक अरविंद व्यं. गोखले
लोकमान्य टिळक चरित्र व आठवणी (भाग १ ते ६), लेखक प्रा.वामन शिवराम आपटे
लोकमान्य टिळक दर्शन, लेखक : भालचंद्र दत्तात्रेय खेर
लोकमान्य टिळक, लेखक : पु.ग. सहस्रबुद्धे
लोकमान्य टिळक यांचे चरित्र (३ खंड), लेखक न.चिं. केळकर
लोकमान्यांची सिंहगर्जना, लेखक गिरीश दाबके
लोकमान्य ते महात्मा लेखक सदानंद मोरे
लोकमान्य व लोकराजा लेख लेखक इंद्रजित नाझरे
लाल,बाल,पाल लेख लेखक इंद्रजित नाझरे
लोकमान्य टिळकांच्या जीवनावर "दुर्दम्य" नावाची चरित्रात्मक कादंबरी प्रा.गंगाधर गाडगीळ यांनी लिहिली आहे.चित्रपट
"लोकमान्य : एक युगपुरुष" (दिग्दर्शक - ओम राऊत, टिळकांच्या भूमिकेत सुबोध भावे) - इ.स. २०१५.
टिळकांवर न निघालेला चित्रपट
चित्रपट निर्माते विनय धुमाळे यांनी टिळकांवर चित्रपट बनवण्यासाठी १९९८मध्ये केंद्र सरकारकडून अडीच कोटी रुपयांचे, तर राज्य सरकारकडून पन्नास लाख रुपयांचे अनुदान घेतले होते. मात्र तेव्हापासून आजपर्यंत हा चित्रपट बनलेला नाही. त्याबद्दल पुण्यातील विष्णू रामचंद्र कमळापूरकर यांनी माहिती अधिकाराचा वापर करून पाठपुरावा केला होता. अनुदान घेतल्यानंतर तब्बल सोळा वर्षे हा चित्रपट अपेक्षेनुसार बनविण्यात धुमाळे यांना अपयश आल्याचा निष्कर्ष राज्याच्या सांस्कृतिक विभागाने काढला असून, या अनुदानाची व्याजासकट वसुली करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
विनय धुमाळे यांनी शासकीय अर्थसाहाय्यातून निर्माण केलेला 'लोकमान्य' चित्रपट (डीव्हीडी स्वरूपातील) हा अतिशय सुमार दर्जाचा असून राष्ट्रपुरुषांवर चित्रपट बनविण्याचा उद्देश या चित्रपटातून सफल झालेला नाही, असे स्पष्ट मत राज्य सरकारच्या चित्रपट परीक्षण समितीने नोंदविले आहे. या समितीमध्ये संजीव कोलते, भक्ती मायाळू, प्रकाश जाधव, बाळासाहेब गोरे, विजय कोंडके, मधु कांबीकर, ललिता ताम्हाणे, महेश लिमये व सदस्य सचिव म्हणून मंगेश मोहिते यांचा समावेश होता. या चित्रपटाच्या सर्वच अंगांची समितीने चिरफाड केली आहे. हा चित्रपट नसून अडीच तासांचा माहितीपट असल्याचे समितीने नमूद केले असून सरकारचा या बाबतचा हेतू सफल झालेला नसल्याचेही त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
पुतळे:-
महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांचे बरेच पुतळे आहेत, त्या पुतळ्यापैकी काहींना विशेष इतिहास आहे. टिळकांचे पुतळे असलेल्या काही शहरांची आणि तेथील लोकमान्य टिळकांच्या काही पुतळ्यांची यादी पुढे दिली आहे :-
खामगाव (बुलढाणा जिल्हा
तळोदा (नंदुरबार जिल्हा)
नवी दिल्ली (महाराष्ट्र सदन-प्रस्तावित)
नागपूर
निगडी (पुणे)
पुणे (भाजी मंडई/रे मार्केट/फुले मार्केट ; टिळक स्मारक मंदिर, गायकवाड वाडा/केसरी वाडा)
बार्शी (भाजी मंडई)
बोरीवली (मुंबई) : हा पुतळा रस्त्यावरचे सिग्नल दिसण्याला अडथळा होतो, म्हणून हलवणार आहेत.
मुंबई (गिरगांव चौपाटी) : हा टिळकांचा पहिला पुतळा - टिळकांच्या हयातीतच शिल्पकार रघुनाथराव फडके यांनी टिळकांना समोर बसवून बनवला.
रत्नागिरी (टिळकांच्या राहत्या घराच्या केलेल्या स्मारकात)
[इचलकरंजी] राजवाडा चौक टिळक रोड .
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लोकमान्य टिळकांचा देखील पुतळा उभारण्यात येणार आहे
पुण्याच्या भाजी मंडईतील पुतळा
पुण्याच्या महात्मा फुले मंडईत पांढऱ्या शुभ्र मेघडंबरीत असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे २२ जुलै १९२४ रोजी अनावरण झाले. लोकमान्यांच्या निधनानंतर लगेचच म्हणजे १७ ऑगस्ट १९२० रोजीच्या पुणे नगरपालिकेच्या सभेत या पुतळ्याचा ठराव मांडण्यात आला व त्यासाठी पंधरा हजार रुपयांची तरतूदही करण्यात आली. त्यानंतर वर्षभराने झालेल्या सभेत शिल्पकार विनायक व्यंकट वाघ यांना आगाऊ सहा हजार रुपये देण्यात यावेत, असे ठरले. नगरपालिकेच्या अकाउंटंटने मात्र या खर्चासाठी प्रांतिक सरकारची म्हणजे मुंबई सरकारची परवानगी घ्यावी असे सुचविले. ९ जून १९२२ रोजी नगरपालिकेचे लोकनियुक्त अध्यक्ष न.चिं. केळकर अध्यक्षस्थानी असलेल्या पालिकेच्या सभेत अकाउंटंटचा आक्षेप चर्चेला आला असता, ‘या खर्चासाठी अन्य कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही,’ असे मत व्यक्त झाले.
१९२२-२३ मध्ये सरकारी हिशेब तपासनिसाने पुतळा आणि शिल्पकाराचा खर्च करण्यास मनाई केली. जिल्हाधिकाऱ्यांनीतर ६ हजार रुपये वसूल करण्यासाठी भारतमंत्री (Secretary of State for India) यांच्या वतीने जिल्हा कोर्टात दावा दाखल केला. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात अशा प्रकारचा दावा झालेला हा पहिलाच पुतळा असावा. टिळक हयात असताना सरकार त्यांच्यावर खटले भरतच होते, आता पुतळ्यावर खटला सुरू झाला. सरकार आणि कोर्ट या दोघांचेही दडपण पुणे नगरपालिकेच्या अध्यक्षांवर आले. शिल्पकार वाघांना या कशाचीच गंधवार्ता नव्हती.
कोर्टाने पुतळा उभारण्याच्या खर्चाला बंदी घातली होती. अखेर केसरी मराठा ट्रस्टने खर्चाची बाजू उचलण्याची तयारी दाखवली. न्यायालयात विरुद्ध निकाल गेल्यास हे पैसे ट्रस्ट परत मागणार नाही, असे सांगितल्याने २२ जुलै १९२४ रोजी पंडित मोतीलाल नेहरू यांच्या हस्ते पुतळा बसविण्यात आला. मात्र न्यायालयाने सरकारविरुद्ध निर्णय दिला आणि पुणे नगरपालिकेची भूमिकाच योग्य ठरली.
Wednesday, 13 July 2022
शेठ.के.डी.हायस्कुय तळोदा येथे गुरुपोर्णिमा उत्साहात साजरी
शेठ.के.डी.हायस्कूल तळोदा येथे गुरुपोर्णिमा कार्यक्रम संपन्न.
तळोदा-पी.ई.सोसायटी संचलित शेठ.के.डी. हायस्कूल तळोदा येथे आज दि.१३ जुलै २०२२ रोजी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.जे.एल.सुर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी- उपमुख्याध्यापक श्री.एस.डी.शिवदे सर होते.
सर्वात प्रथम सरस्वती मातेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. प्रास्ताविक-श्रीमती.जे.आय.राणे मॅडम व
सौ.जे.एस.पाटील मँडम यांनी केले.
सुत्रसंचालन:- श्री.पी.एम.वानखेड व सौ.एस.के.माळी मँडम यांनी केले.
आभार प्रदर्शन:- श्रीमती.एन.जे.वळवी मॅडम व श्री.आर.आय.चव्हाण यांनी केले.
विद्यार्थी भाषणात इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शिक्षक भाषणात-श्री.ए.बी. वायकर,पर्यवेक्षक श्री.पी.पी. पाटील, श्री.एस.आय. जोहरी श्री.एस.एस.ठाकरे, सौ.जे.डी.देवरे मँडम यांनी मनोगत व्यक्त केले.
सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसे श्री.व्ही.आर.सुर्यवंशी सर व पर्यवेक्षक श्री.पी.पी.पाटील सर यांच्या कडून पेन देण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.जे.एल.सुर्यवंशी सर,उपमुख्याध्यापक श्री.एस.डी.शिवदे सर, पर्यवेक्षक श्री.पी.पी.पाटील सर
तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधु-भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधु-भगिनी यांनी परिश्रम घेतले सामुहिक राष्ट्रगीत घेऊन समारोप करण्यात आला.
Tuesday, 12 July 2022
गुरुपौर्णिमा
आई, वडील आणि शिक्षकांप्रमाणे माणसाला जीवनात आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आध्यात्मिक गुरूंची देखील गरज असते. खरे गुरू तेच असतात जे शिष्याला त्याचे जीवन आणि संसार सुखाचा करण्यासाठी योग्य आणि अचूक मार्गदर्शन करतात. अशा गुरूंना शिष्य सदगुरूंचा मान देतात. मात्र आजकाल गुरू मार्ग दाखविण्याऐवजी व्यवहार करून शिष्यांची फसवणूक करतानाच जास्त दिसतात. त्याच प्रमाणे स्वतःजवळील अपूऱ्या ज्ञानातून शिष्याचा बुद्धीभेद करणारे गल्लाभरू गुरू गल्लोगल्ली निर्माण झाले आहेत. अशा प्रकारच्या गुरूंची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे खरे गुरू अथवा सदगुरू ओळखणे कठीण झाले आहे. यासाठी शिष्याने गुरूची ओळख पटविण्यासाठी भोळसट भावापेक्षा तर्कशुद्ध बुद्धीचा वापर करावा.
गुरूचे कार्य
गुरूचे कार्य हे एक महान कार्य आहे. आपल्या शिष्यांच्या भल्याचा विचार करून त्यांना आपल्याजवळील ज्ञान आणि अनुभव निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे देणे हे गुरूचे खरे कार्य असते. ज्ञान देताना गुरूची भावना ही अहंकाराची नसावी. या ज्ञानाने आपल्या शिष्याच्या जीवनाचे कल्याण होणार आहे अशी भावना गुरूकडे असावी. कारण जेव्हा गुरूने दिलेल्या ज्ञानाने शिष्याची प्रगती होते तेव्हा ती प्रगती पाहून जर गुरूला आनंद आणि समाधान झाले तरच तो खरा गुरू जाणावा. शिष्याला जितकी गुरूची गरज असते तितकीच गुरूला देखील शिष्याची गरज असते. जर शिष्यच नसेल तर गुरू आपले ज्ञान कोणाला देणार. म्हणूनच गुरूने देखील आपल्या शिष्याबद्दल कृतज्ञ असावे.
शिष्याची वागणूक:-
गुरूकडून मिळालेले ज्ञान नम्रपणे स्विकारतो त्या शिष्याला गुरूकडून मिळालेले ज्ञान जसेच्या तसे मिळते. कारण ज्ञान ग्रहण करताना शिष्याकडे नम्रपणा नसेल तर गुरूकडे शिष्याबद्दल प्रेम आणि आपलेपणा असूनही शिष्याला समजावणे गुरूला कठीण जाते. कारण ज्ञानप्राप्तीमध्ये शिष्याचा अंहकार अडथळा निर्माण करत असतो. यासाठीच शिष्याची गुरूवर मनापासून श्रद्धा असणं गरजेचं आहे. त्याचसोबत गुरूकडून मिळवलेलं ज्ञान आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा शिष्याने तंतोतंत प्रयत्न करणे देखील गरजेचे आहे. असे केल्यास शिष्याच्या पाठी गुरूच्या ज्ञानाचे बळ आणि साधना निर्माण होते आणि त्याची आयुष्यात प्रगती होत जाते.
गुरूपौर्णिमा:-
आपल्या भारत भुमीत गुरू शिष्य परंपरा फार प्राचीन काळापासुन चालत आलेली आहे. शिष्य अध्ययनाकरीता गुरूजवळ येतो आणि गरू हातचे न राखता शिष्याला अध्ययना सोबतच जिवनाच्या वाटचालीतले दर्शन घडवुन शिष्याला घडवतो. एक कुंभार ज्याप्रमाणे सुबक रितीने मातीचे मडके घडवतो अगदी त्याच तऱ्हेने गुरू चांगल्या वाईट गोष्टींची पारख घडवुन अत्यंत परिश्रमाने शिष्याला घडवतो. या गुरूला काही अंशी उतराई होण्याची संधी शिष्याला मिळावी त्याकरीता ’’गुरूपौर्णिमा ’’ हा दिवस निर्मीलेला आहे.
गुरूपौर्णिमेचे महत्त्व – Importance of Guru Purnima
गुरूपौर्णिमा यालाच व्यासपौर्णिमा (Vyasa Purnima) असे देखील म्हंटल्या जाते. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हा दिवस संपन्न होतो.
“गुरू थोर म्हणावा की देव थोर म्हणावा
नमस्कार आधी कुणासी करावा?
मला वाटते की गुरू थोर आहे
तयाचीये योगे रघुनाथ पाहे… "
भक्ताला परमेश्वराची ओळख गुरूमुळेचे होते त्यामुळे परमेश्वर आणि गुरू यांपैकी आधी नमस्कार कुणाला करावा हा प्रश्नं जर पडला तर आधी गुरूला नमस्कार करावा…
गुरूपौर्णिमेला व्यासपुजा करण्याची पध्दत आहे. महर्षी व्यासांनी महाभारतासारखा अलौकिक आणि सर्वात श्रेष्ठ असा ग्रंथ लिहीला. महाभारत सामान्य माणसाला धर्मशास्त्र, नितीशास्त्र, व्यवहारशास्त्र, आणि मानसशास्त्राची देखील ओळख करून देतो. अश्या महान आणि श्रेष्ठ ग्रंथाची निर्मीती करणारे महर्षी व्यास. त्यांच्या ऐवढा महान गुरू अद्याप झाला नाही, त्यांच्या श्रेष्ठत्वाची पुजा करण्याचा हा गुरूपौर्णिमेचा दिवस व्यासपौर्णिमा म्हणुन देखील ओळखला जातो
भारतीय संस्कृतीचे मुलाधार आणि शिल्पकार महर्षी व्यासांना समजले जाते. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील ज्यावेळी ’ज्ञानेश्वरी ’ लिहीण्यास सुरूवात केली त्यावेळी सुरूवातीलाच ’व्यासांचा मागोवा घेतु’ असा उल्लेख करून व्यासांच्या श्रेष्ठत्वाप्रती कृतज्ञता व्यक्त केलेली आपल्याला पहायला मिळते.
कृष्ण सुदामा यांना सांदिपनी ऋषींनी घडवले, त्याचप्रमाणे इतर प्रसिध्द गुरू शिष्य जोडयांमधे राम लक्ष्मण – विश्वामित्र, परशुराम – कर्ण, अर्जुन – द्रोणाचार्य, जनक – याज्ञवल्क्य, शुक्राचार्य – जनक, अश्या गुरूशिष्य जोडया आपल्याला पहायला मिळतात.
भगवंत श्रीकृष्णांनी सांदिपनी ऋषींच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी आपले थोरले बंधु निवृत्तीनाथांनाच गुरू मानले, तर संत नामदेवांचे गुरू होते विसोबा खेचर… या गुरूपरंपेला पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की भारतीय परंपरेने गुरूला कायमच पुजनीय मानले आहे.
अश्या या गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपण गुरूपौर्णिमेला गुरूचरणी नतमस्तक होत आदर व्यक्त करतो. पौर्णिमा म्हणजे प्रकाश ! गुरू नित्य शिष्याला ज्ञानाचे ज्ञानामृत पाजुन घडवत असतात अश्या गुरूची प्रार्थना करण्याचा हा दिवस…..
आपली सर्वात पहिली गुरू म्हणजे आपली आई ! चांगले काय? वाईट काय याची जाणीव ती सर्वप्रथम आपल्याला करून देते आणि म्हणुन ती आपली गुरू ठरते. पुढे अध्ययनाच्या रूपाने नव्या गुरूशी आपला परिचय होतो आणि आपण घडत जातो. ही गुरू शिष्य परंपरा आपल्याला भारता व्यतिरीक्त इतर कुठेही पहायला मिळत नाही. या गोष्टीवरून आपल्या लक्षात येतं की आपण किती महान देशात जन्म घेतला आहे.
गुरू हा ज्ञानाचा सागर आहे. शिष्याने विनम्र भाव अंगी बाणवल्याशिवाय या गुरूरूपी सागरातील जल त्याला प्राप्त करता येणार नाही त्यामुळे शिष्याने नेहमी विनम्र असावे. जीवन जगत असतांना प्रत्येक वळणावर आपल्याला नवनवीन माणसे भेटतात. त्यांच्याकडुन आपल्याला नविन काहीतरी शिकायला मिळतं. ज्यांच्याकडुन चांगले काहीतरी आपल्याला शिकायला मिळाले ते आपले गुरूच!
गुरूब्रम्हा गुरूर्विष्णुः गुरूर्देवो महेश्वरः।
गुरूसाक्षात् परंब्रम्ह तस्मै श्रीगुरूवे नमः।।
आयुष्य जगत असतांना आपल्याला गुरूने शिकवीलेले सदाचरण कायम आपण लक्षात ठेवावयास हवे आणि पुढच्या पिढीकडे संस्कारातुन हस्तांतरीत करायला हवे. हीच आपल्या गुरूचरणी आपली खरी गुरूदक्षिणा ठरेल!
तर आपल्याला चांगले वाईट शिकवणाऱ्या माता-पित्यास, गुरुजन वर्गाला या लेखाला गुरुदक्षिणा म्हणून समर्पित करतो आणि या लेखाची सांगता करतो, आज आपण जे काही आहोत ते त्यांच्या मुळेच म्हणून त्या सर्व जीवन जगायला शिकवणाऱ्या शिक्षकांना विनम्र अभिवादन.
🙏🙏🙏🙏🙏🙏
Monday, 11 July 2022
२१ जुन योग दिवस
पी.ई.सोसायटी संचलित शेठ.के.डी.हायस्कुल तळोदा येथे मुख्याध्यापक मा.श्री.जे.एल.सुर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.२१ जुन रोजी जागतिक योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्री.जे.एन.माळी सर & श्री.पी.बी.राजपुत सर यांनी योगासनाचे प्रात्यक्षित करुन दाखवले.विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून देण्यात आले. दरम्यान विद्यार्थी हसत खेळत योगात सहभागी झालेत.
विद्यार्थ्यांच्या मनावर चांगला परिणाम होण्यासाठी व उत्तम विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना योग येणे आवश्यक आहे. त्या करिता सर्वच शाळांमध्ये २१ जून हा जागतिक योगा दिन म्हणून साजरा होतो. श्री.पी.एम.वानखेडे सर* यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून दिले. योगासने नियमित करा त्यामुळे ताण तणाव कमी होऊन, मन प्रफुल्लीत राहते, तसेच आरोग्य सुदृढ राहते. नियमित योगा केल्याने मनुष्य आजारा पासून लांब राहतो. यासह कुठले योगासने करावीत व त्याचे फायदे काय या बद्दल माहिती दिली. दरम्यान विद्यार्थ्यांना खेळी मेळीचा वातावरणात योगासने केली व महत्व जाणून घेतले.
यावेळी सर्व शिक्षक व शिक्षेकतर कर्मचारी बंधु-भगिनी उपस्थित होते.
प्रवोशोत्सव शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा
शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा. पी.ई.सोसायटी संचलित शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा येथे आज दि.१६/०६/२०२५, वार-सोमवार रोज...

.jpeg)







