शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा.
पी.ई.सोसायटी संचलित शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा येथे आज दि.१६/०६/२०२५, वार-सोमवार रोजी मुख्याध्यापक मा.श्री.जे.एल.सुर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन हर्षोल्हासात स्वागत करण्यात आले.तसेच संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.आप्पासाहेब लक्ष्मण बबनराव माळी(अध्यक्ष-पी.ई.सोसायटी तळोदा),मा.श्री. बच्चुसिंग भैय्या कन्हैय्यालाल परदेशी(कोषाध्यक्ष-पी.ई.सोसायटी तळोदा),मा.श्री.डी.एम.माळी सर(जेष्ठ संचालक पी.ई.सोसायटी तळोदा) यांच्या कडुन नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. व पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.व एक पेड माँ के नाम अंतर्गत मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.व नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल नवागत विद्यार्थ्यांचा पायाचा ठसा कोरा कागदावर घेऊन मुख्याध्यापक, वर्गशिक्षकांची सही शिक्का करून तो कागद पालकांना देण्यात आला. व विद्यार्थ्यांना मिष्टान्न वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी रांगोळी काढण्यात आली.व प्रवोशोत्सव कार्यक्रमात दलेलपुर गावचे सरपंच देखील उपस्थित होते.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.जे.एल.सुर्यवंशी सर,उपमुख्याध्यापक श्री.जे.एन.माळी सर, पर्यवेक्षक श्री.पी.पी.पाटील सर तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.






No comments:
Post a Comment