Saturday, 10 October 2020

संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी


  राष्ट्र संत तुकडोजी महाराज


मूळ नाव :- माणिक बंडोजी इंगळे


जन्म :- एप्रिल २७, १९०९ यावली, जि. अमरावती


निर्वाण :- ऑक्टोबर ३१, १९६८


गुरू :- आडकोजी महाराज


भाषा :- मराठी, हिंदी:साहित्यरचना


ग्रामगीता, अनुभव सागर भजनावली, सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली


कार्य :- अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन


वडील :– बंडोजी


आई :- मंजुळाबाई



राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी ३० एप्रिल १९०९ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोपंत आणि आईचे नाव मंजुळा होते. ते ब्रम्हभट वंशातले होते. भट शब्दाचा अपभ्रश होऊन त्यांना भात म्हणत. बारश्याला दिनांक ११ मे १९०९ रोजी आकोटचे श्री हरीबुवा, माधानचे प्रज्ञांचक्षु  श्री संत गुलाब महाराज व याव्लीचे महाराज यांनी मुलाचे नाव ‘माणिक’ ठेवले आणि आशीर्वाद देवून निधून गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार येथे झाले. श्री संत आद्कोजी महाराजांनी त्यांचे नाव ‘तुकड्या’ ! ठेवले होते.

सन.१९२५ मध्ये त्यांनी ‘आनंदामृत’ ग्रंथाची रचना केली. ते स्व:त भजन,कीर्तन, प्रवचन करू लागले. त्यांनी खंजेरी वर उत्तम भजने गायली.दि. २३ फेब्रुवारी १९३५ शनिवार रोजी सालबर्डी येथील अज्ञांत आले. पुढे त्यांचा गांधीजींशी सहवास झाला. २८ ऑगष्ट१९४२ शुक्रवार रोजी स्वातंत्र्य संग्राम चळवळीत भाग घेतल्याने त्यांना अटक झाली. आणि डिसेम्बर मध्ये सुटका झाली. १९४३ मध्ये विश्वशांतीनाम सप्ताह झाला.५ एप्रिल १९४३ सोमवार रोजी श्री गुरुदेव मुद्र्नाल्याची निर्मिती करून गुरुदेव मासिकाचे प्रकाशन केले. १९ नोहेंबर १९४३ शुक्रवार रोजी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली.हरीजनां साठी त्यांनी मन्दिरे खुली केली. ते म्हणत गावा गावासी जागवा ।  भेदभाव समूळ मितवा” उजळा ग्रामोन्नतिचा दिवा । तुकड्या म्हणे ।”



संत रामदासांनी ‘दासबोधा’तील एका समासात ‘कसं लिहावं?’ हे सांगितलं आहे तर संत तुकडोजी महाराजांनी ‘काय वाचावं?’ नि ‘कशासाठी वाचाव?’ हे त्यांच्या ‘ग्रामगीते’च्या चाळिसाव्या अध्यायात सांगितलं आहे. या अध्यायाचं नाव आहे ‘ग्रंथाध्ययन.

 महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत.



 

महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.


देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला.


संत तुकडोजी महाराज यांनी जनजागृती कशी केली


ते आपल्या भजनातून जाती भेद पाळू नका, अस्पृश्यता गाडून टाका, दारू पिवू नका, देशावर प्रेम करा असा उपदेश करीत.  प्रत्येक भजनाच्या प्रारंभी थोडे गुरु स्मरण व अंधश्रद्धा, वाईटरूढी,व्यसने यांचा त्याग करा. अस्या आशयाचे थोडा वेळ भाषण केले कि, हातातील खन्जरीच्या वेगवान ठेक्यावर त्यांचे पहाडी आवाजातील व सुंदर चालीतील मराठी-हिंदी पदांचे भजन सुरु होई व त्यात कुठल्याही थरातील वा धर्मातील श्रोता तल्लीन होवून जाई.  सर्व पंथांचे व धर्माचे लोक त्यांचे अनुयायी बनले. व त्यांना राष्ट्र संत तुकडोजी या नावाने संबोधू लागले. ‘ ग्रांमगीता’ लिहून गावाचे व लोकांचे कल्याण कशात आहे हे समजाविले.भारत कृषी प्रधान देश आहे. म्हणून कृषी उद्योगात सुधारणा सुचविली. सामुदायिक प्राथना करावी.  सर्वांशी प्रेमाने वागाव. गोवध बंदी, व पशु संर्वधन करावे हे शिकविले.

भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी गुरुकुंज मोझरीला भेट देण्यासाठी इ.सन १९ मार्च १९५६ रोजी रविवारला गेल्यात. चीन युद्ध १९६२ व पाकीस्थान युद्ध १९६५ झाले तेव्हा सैन्यास धीर देण्या साठी स्व:त सीमेवर जाउन वीरगीते गाईली, व सैन्याचे धैर्य वाढविले. ते फ़ार प्रयत्नवादि  होते.तन,मन,धनाने त्यांनी राष्ट्राची सेवा केली. ते खरे राष्ट्र संत होऊन गेले. दिनांक ११ आक्टोंबर १९६८ गुरुवार रोजी हे वंदनीय राष्ट्रसंत ब्रम्हलीन झाले.  त्यांचे चरणी आपले शत: शत: प्रणाम🙏

4 comments:

  1. छान माहिती

    ReplyDelete
  2. फारच छान माहिती आहेत.सर आपण केलेल्या कामाची नोंद कुठे तरी घेतली जाते.आपण एक तंत्रस्नेही,कृतिशील शिक्षक आहात.आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

    ReplyDelete
  3. Very nice information,great work sirji,keep it up 👍

    ReplyDelete

प्रवोशोत्सव शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा

  शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा. पी.ई.सोसायटी संचलित शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा येथे आज दि.१६/०६/२०२५, वार-सोमवार रोज...